मुरगूड हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकवर कठोर कारवाईची मागणी.
मुरगूड हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकवर कठोर कारवाईची मागणी.
------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------------
शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना मुरगूड शेजारी शाळेत घडली असून, एका नराधम मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित नराधम शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी 'शिवभक्त' आणि समस्त मुरगूडवासीयांच्या वतीने मुरगूड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरगूड शेजारी एका नामांकित शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. "गुरु-शिष्य" या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूडमधील शिवभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की : सदर शिक्षकाने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याने शहराचे नाव बदनाम केले आहे. अशा नराधमांमुळे समाजात शिक्षकी पेशाबद्दल चुकीचा संदेश जात आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात असे धाडस कोणाचेही होणार नाही.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "शिक्षण क्षेत्रात अशा नराधम प्रवृत्तींना जागा असता कामा नये. या कृत्यामुळे संपूर्ण शहराचे नाव बदनाम झाले असून, अशा नराधमांना समाजात फिरण्याचा अधिकार नाही." अशा नराधम मुख्याध्यापक यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
वरिष्ठांपर्यंत मागणी पोहोचवण्याचे आश्वासन मुरगूड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी 'शिवभक्त' समूहाचे प्रतिनिधी आणि मुरगूड शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पोलीस या नराधम मुख्याध्यापका वर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, विशाल कापडे, तानाजी भराडे, पंकज मेंडके, विशाल मेंडके, अभी मिटके, श्रीधर कोंडेकर, रणजीत सूर्यवंशी, सुखदेव येरुडकर, सिकंदर जमादार, ऋषिकेश पाटील, महेश ढोबळे, रवि सावंत, बाळासो कांबळे, अमोल कांबळे, प्रतिराज कांबळे, केशव पाटील, पंकज देसाई, स्वप्निल पोवार, प्रभू पाटील, विकी बोरगावे, बाळासो कांबळे, सुनील डवरी, सुखदेव चौगुले, चंद्रकांत हाळदकर, जॉर्ज बारदेस्कर, अरविंद शिंदे, नेताजी कांबळे, संदीप पाटील, नितीन कांबळे, संजय कानकेकर, सूर्यकांत अंगज, दिनेश कांबळे, निवेदन देताना शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: