गगनबावडा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी
गगनबावडा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी.
***********************
सुपर भारत शशिकांत कुंभार
************************
कोल्हापूर :कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील हॉटेल बालाजीसमोर रविवारी संध्याकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले असून, एका दुचाकीस्वाराविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ११ जानेवारी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास संकेत घोटवडेकर यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. संकेत यांचा भाऊ धनाजी घोटवडेकर राहणार खुपिरे हे आपल्या फॅशन मोटारसायकलवरून क्रमांक एम ०९ वाय २७९ जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलने क्रमांक केए. २४.इ सी.४५३० त्यांना जोराची धडक दिली.
पल्सर चालक नागराज संतोष कुराणे बेळगाव याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून जाणाऱ्या टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्याची समोरून येणाऱ्या घोटवडेकर यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात धनाजी घोटवडेकर राहणार खुपिरे ,शिवकरण सिंह गंगाप्रसाद यादव राहणार नायरा पेट्रोल पंप, बालिंगा , नागराज संतोष कुराणे आरोपी दुचाकी चालक जखमी झाले आहेत.
जखमींवर रेणुका हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून, रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
याप्रकरणी करवीर पोलिसांनी आरोपी नागराज कुराणे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आहे .प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

No comments: