उचगांवजवळ पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर TVS आयक्युब इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग; दुचाकी जळून खाक.
उचगांवजवळ पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर TVS आयक्युब इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग; दुचाकी जळून खाक.
------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
------------------------------------
कोल्हापूर : पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उचगांव परिसरात TVS कंपनीच्या आयक्युब इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. महामार्गावरून उचगांवकडे जात असताना इलेक्ट्रिकल दुचाकीतून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत चालकाने दुचाकी तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. काही क्षणातच दुचाकीने पेट घेतला व आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार संबंधित इलेक्ट्रिक दुचाकी निवास यमगर यांच्या मालकीची आहे. घटनेनंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली, त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली पण त्यावेळी गाडी जळून खाक झाली होती.

No comments: