Header Ads

इलेक्शन व जयंतीसाठी भाड्याने देण्यासाठी चोरी केलेल्या १० मोटरसायकली जप्त.करवीर पोलिसांची धडक कारवाई.

 इलेक्शन व जयंतीसाठी भाड्याने देण्यासाठी चोरी केलेल्या १० मोटरसायकली जप्त.करवीर पोलिसांची धडक कारवाई.

-------------------------------

शशिकांत कुंभार

-------------------------------

करवीर, दि. १९ जानेवारी २०२६ –

इलेक्शन व विविध जयंती कार्यक्रमांमध्ये वाजवण्यासाठी भाड्याने देण्याच्या उद्देशाने चोरी केलेल्या यामाहा व सुझुकी कंपनीच्या एकूण १० मोटरसायकली करवीर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत १,६४,९०० रुपये किमतीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून एक आरोपी व एक विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल आहे. फिर्यादी महेश पंडित सुर्वे (वय ४०, रा. भुयेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दि. २९/१२/२०२५ रोजी रात्री ११.०० ते दि. ३०/१२/२०२५ रोजी सकाळी ६.३० या कालावधीत त्यांच्या घरासमोरून मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार दिली होती.

दि. १८/०१/२०२६ रोजी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सरवडेकर (बॅ. नं. १८७२) यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम राजाराम बंधारा ते निगवे रोडवर चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून भुयेवाडी रोडवर दोन यामाहा मोटरसायकलींसह दोन संशयितांना ताब्यात घेतले. मोटरसायकलींना नंबर प्लेट नसल्याने चौकशी केली असता कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.

सखोल चौकशीत आरोपींनी शिये, लाटवडे व इतर ठिकाणांहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासात वडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २१/२०२६ तसेच करवीर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याशी या चोरीचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले.

पुढील चौकशीत आरोपींनी आणखी ०३ यामाहा व ०७ सुझुकी मोटरसायकली भुयेवाडी, लाटवडे, भुये, घुणकी, शिये, वडगाव व टोप येथून चोरी केल्याची कबुली दिली. या सर्व मोटरसायकली आरोपी क्र. १ याच्या घराजवळ लपवून ठेवल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्या जप्त केल्या. तसेच चोरीसाठी वापरलेली ०१ स्प्लेंडर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली. एकूण ११ मोटरसायकली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अटक आरोपीचे नाव अभिषेक सुधीर कुरणे (वय २३, रा. शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असून दुसरा आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सपोनि सरवदे तसेच करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

No comments:

Powered by Blogger.