पाडळी खुर्द ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळमुळीच्या वातावरणात पार पडली.
पाडळी खुर्द ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळमुळीच्या वातावरणात पार पडली.
------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द ग्रामपंचायतची गावसभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली, अध्यक्षस्थानी सरपंच तानाजी पालकर हे होते
15 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी गावसभा पाडळी खुर्द ग्रामपंचायत ने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 11 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच तानाजी पालकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची यादी वाचन करण्यात आले ते मंजूर करण्यात आली
कृषी योजनेची माहिती करवीरच्या कृषी अधिकारी सौ प्रियंका पाटील यांनी गाव सभेत देण्यात आली
पाडळी येथील महादेव मंदिर जवळ असणारे पार्किंग व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात येणार आहे तसेच गावाजवळ असणारा नाल्यामध्ये कचरा टाकला जातो तो कचरा टाकू नये यासंबंधी डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहे व गणेश पार्कतील विकास कामा संदर्भात चर्चा करण्यात आली असे अनेक ठराव ग्रामसभेत करण्यात आला
या ग्रामसभेत सरपंच तानाजी पालकर उपसरपंच सुरज सुतार सदस्य शिवराज पाटील प्रकाश पाटील सौ माधुरी पाटील सौ कांचन पाटील सौ सई सोहनी सौ मंगला पाटील किशोर पाटील सौ सुवर्णा पाटील सौ नीलम कांबळे संदीप कांबळे सौ मंगल पाटील , हे सदस्य व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग हजर होते शेवटी आभार ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी मानले
Comments
Post a Comment