पन्हाळा तालुक्यातील माजगाव ते कसबा ठाणे रस्त्याची दुरवस्था ; तातडीने रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी.
पन्हाळा तालुक्यातील माजगाव ते कसबा ठाणे रस्त्याची दुरवस्था ; तातडीने रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी.
-----------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
पन्हाळा तालुक्यातील माजगाव ते कसबा ठाणे दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्यात पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यावर पडलेले खड्डे भरावे अशी मागणी होतेय.
पन्हाळा तालुक्यातील
माजगाव ते कसबा ठाणे दरम्यानचा रस्ता जोरदार पावसामुळं अत्यंत खराब झाला असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
खडीकरणाने तातडीने खड्डे भरावे अशी वाहनधारकांमधून होत आहे.
हा रस्ता परिसरातील सात ते आठ गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पडळ, यवलूज, सातार्डे, माजगाव, कसबा ठाणे, माळवाडी, शिंदेंवाडी, खोतवाडी आदी गावातील वाहनधारक या मार्गावरून नियमित प्रवास करतात.
मात्र, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. खड्ड्यात पावसाचं पाणी साचून रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी वाहनांचे नुकसान तसेच अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
परिणामी रस्त्याची तातडीने डागडुजी करून खड्डे भरावेत अशी मागणी होत आहे
Comments
Post a Comment