वांगी पिकाच्या फडावर शेतकऱ्याने फिरवला रोटर कीडीचा प्रादुर्भाव वाढला; दरात घसरण.
वांगी पिकाच्या फडावर शेतकऱ्याने फिरवला रोटर कीडीचा प्रादुर्भाव वाढला; दरात घसरण.
---------------------------------
अंबप प्रतिनिधी
किशोर जासूद
----------------------------------
बाजारात वांग्याच्या भावात झालेली घसरण तसेच वाढता किडीचा प्रादुर्भाव यामुळे कीटकनाशकाची फवारणी परवडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असून, वांग्याच्या फडावर रोटर फिरण्याच्या निर्णय हातकणंगले तालुक्यातील पाडळी येथील शेतकरी संतोष पाटील यांनी घेतला आहे.
पाडळी येथील शेतकरी संतोष पाटील यांनी कृषीचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित शेतकरी आहेत. यांनी आपल्या शेतात उन्हाळ्यात रोपवाटिकेतून शिरगांव काटा व कुडची ८०० रोपांची २० गुंठे लावण केली होती. यावर मशागतीपासून वांगी तोडणीपर्यंत वेळोवेळी खर्च करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून वांग्याच्या किंमती घसरल्या आहेत. आता मिळणारा भाव इतका कमी झाला आहे की, अनेक शेतकरी आपली वांगी विकण्यापेक्षा ती फेकून देणं पसंत करतात. वांग्याची वाढती आवक आणि बाजारातील कपात यामुळे दरात घसरण झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये पंधरा ते वीस रुपये प्रती किलोपर्यंत दर मिळत आहे. या दरात शेतातून वांगीची तोडणी, मजुरीचा खर्च, वाहतूक खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा झाला आहे.
तसेच वांगी पिकातील पांढरी माशी, तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि लाल कोळी यांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की वारंवार कीटकनाशकाची फवारणी करूनही कीड आटोक्यात येईना याचा खर्च अवाढव्य होत आहे. या समस्यांना मागील महिन्यापासून शेतकरी तोंड देत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व आता उघडीत यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.
प्रतिक्रिया :
मशागतीपासून वांगी मार्केट पर्यंत वाहतूक खर्च या पिकातून निघाला नाही. शिवाय कीटकनाशकांच्या फवारण्या करणेही परवडणारे यामुळे आर्थिक नुकसान सहन करत रोटर मारण्याचा निर्णय घेतला.
संतोष पाटील
शेतकरी, पाडळी रोटर मारताना
No comments: