Header Ads

अमरावतीत वन विभागाला ५६० कोटींचा निधी; राज्यात १,८०० बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारणार.

अमरावतीत वन विभागाला ५६० कोटींचा निधी; राज्यात १,८०० बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारणार.

-------------------------

प्रतिनिधी / अमरावती

पुंडलिक राव देशमुख.

------------------------


राज्यात वाढत्या बिबट–मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाला तब्बल ५६० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. बिबट प्रवण गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपण, रेस्क्यू युनिट वाढ, तसेच बिबट्यांचे पुनर्वसन या उपाययोजनांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.


राज्यात २९ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली असून अनेकांचे जीव गेले आहेत. पशुधन, पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बिबट्याला वन्यप्राणी संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची-१ मधून अनुसूची-२ मध्ये टाकण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.


डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी योजनेतून बिबट प्रवण भागातील घरे, गोठे, शाळा, दवाखाने याभोवती सौर ऊर्जा कुंपण उभारण्यात येणार आहे. तसेच बिबट्याने हल्ला केल्यास अशा बिबट्यांना ‘नरभक्षक’ घोषित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे, अशी माहिती विशेष कार्याधिकारी उदय ढवळे यांनी दिली.


राज्यातील संघर्षजन्य भागातील बिबटे पकडणे, उपचार करणे आणि संरक्षणासाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये १,८०० बिबट्यांसाठी अत्याधुनिक रेस्क्यू सेंटर उभारले जाणार आहेत. गरजेनुसार इतर जिल्ह्यांतही अशा केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मानव–वन्यजीव संघर्षाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा विचार, तसेच शासकीय यंत्रणांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात रॅपिड रेस्क्यू युनिटची संख्या वाढविण्याचाही निर्णय झाला आहे

No comments:

Powered by Blogger.