Header Ads

कागल-मुरगुड मार्गावर भीषण अपघात; व्हनूर फाट्याजवळ बकऱ्यांचा ट्रक पलटी, सुमारे २०० बकऱ्यांचा जागीच मृत्यू

 कागल-मुरगुड मार्गावर भीषण अपघात; व्हनूर फाट्याजवळ बकऱ्यांचा ट्रक पलटी, सुमारे २०० बकऱ्यांचा जागीच मृत्यू

सलीम शेख.

-----------------


कोल्हापूर  : कागल-मुरगुड मार्गावर बकरी वाहतूक करणारा  करणारा ट्रक पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रकमधील सुमारे २०० हून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक KA 11 D 0927 हा ट्रक बकरी घेऊन जात असताना व्हनूर फाट्याजवळील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक थेट पुलाच्या कठड्याला  धडकून पलटी झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकमध्ये  भरलेल्या सुमारे २०० बकऱ्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर  नागरिकांनी  तात्काळ घटनास्थळी धाव मदत केली. हा ट्रक गारगोटी मार्गे टोल चुकवण्यासाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रक मधील सुमारे 200 बकरी मृत्युमुखी झाल्याने व ट्रक पलटी झाल्याने मोठी आर्थिक हानी झाल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Powered by Blogger.