Header Ads

तामगाव स्मशानभूमीत 'जादूटोणा' सदृश प्रकार: विशिष्ट व्यक्तींच्या नावांचे फोटो गुलालाने माखले!

 तामगाव स्मशानभूमीत 'जादूटोणा' सदृश प्रकार: विशिष्ट व्यक्तींच्या नावांचे फोटो गुलालाने माखले!

----------------------------

सलीम शेख 

----------------------------

तामगाव : तामगाव येथील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आलेल्या एका अघोरी कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या स्मशानभूमीत विशिष्ट व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असलेले फोटो गुलालाने (रंगीत पावडरने) पूर्णपणे माखून टाकलेले आढळून आले आहेत.

गोकुळ शिरगाव नजीकच्या तामगाव येथील स्मशानभूमीत मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीच्या परिसरात काही फोटो अस्ताव्यस्त पडलेले दिसले. हे फोटो उचलून पाहिले असता, त्यावर भीमराव, रूपाली, आशुतोष, स्वप्नील, धनश्री आणि ज्योती यांसारख्या काही विशिष्ट व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केलेला होता. विशेष म्हणजे हे सर्व फोटो जादूटोणा किंवा अघोरी क्रियेत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीने लाल रंगाच्या (गुलालाने) पावडरने माखलेले होते.

स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या अघोरी कृत्याचा वापर नेमका कोणत्या उद्देशाने केला गेला असावा, याबाबत तर्क-वितर्क केले जात आहेत. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या कृत्यामुळे तामगाव परिसरात नागरिकांमध्ये मोठे चर्चा आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामागे कायद्याला धरून नसलेले 'जादूटोणा' सदृश कृत्य करण्याचा उद्देश असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

ज्या व्यक्तींचे फोटो आहेत त्यांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे संपर्क करून अर्ज दिला आहे. ज्यावेळी काही संशयीत नावे निष्पन्न होतील त्यावेळी त्यांच्यावर तक्रार दिली जाईल अशी माहिती समोर येत आहे.

ग्रामस्थांकडून अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या अघोरी कृत्याचा निषेध करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.