Header Ads

भुदरगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी चोरीला गेलेले मोबाईल,मोबाईल धारकांना परत.

 भुदरगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

  चोरीला गेलेले मोबाईल,मोबाईल धारकांना परत.

-------------------------

भुदरगड

स्वरूपा खतकर.

------------------------

  भुदरगड तालुक्यातील गारगोटी हे शेकडो गावाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शिवाय गारगोटीला शिक्षणाची पंढरी म्हूणन ओळखले जाते. याठिकाणी बुधवारी आठवडा बाजार भरत असतो. गारगोटी हे तालुक्यातील प्रमुख व मोठे शहर असल्याने याठिकाणी सर्वच शासकीय  कार्यालये आहेत. दररोज हजारो नागरिक या ठिकाणी ये-जा करत असतात. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी  आठवडा बाजारातून चोरीस गेलेले जवळपास १३ मोबाईल अनेक चोरट्याकडून भुदरगड पोलिसांनी हस्तगत केले होते.

   असे हस्तगत केलेले मोबाईल तक्रादारांना पोलीस ठाणेस बोलवून ओळख पटवून त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. किंमती मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांत कमालीचा आनंद पहावयास मिळत होता. 

बदली झालेले पोलीस निरीक्षक किरण लोंढे. पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील तसेच सध्या  कार्यभार सांभाळत असणारे पोलीस निरीक्षक जी. के. चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे, पोलीस अंमलदार रोहित टिपुगडे, महिला पोलीस अंमलदार नीता देसाई यांच्या पथकाने  ही कामगिरी केली. मोबाईल हरवला अथवा चोरीस गेल्यास तात्काळ भुदरगड पोलीस ठाणे संपर्क करून तक्रार नोंदविण्यास तसेच त्याबाबतची माहिती Ceir.gov. in या पोर्टलवर अपलोड करणे बाबत भुदरगड पोलीसांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. Ceir. gov. In या पोर्टलवर मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवल्यानंतर ऑनलाइन प्रणाली द्वारे सदर मोबाईल नेटवर्क ब्लॉक केले जाते. कोणत्याही व्यक्तींनी सदर मोबाईलवरून फोन लावण्याचा अथवा त्यामध्ये सिम कार्ड घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना मोबाईल ट्रेस झाल्याची माहिती मिळते. अशी माहिती पोलीस निरीक्षक जी. के.चौधर यांनी दिली.

No comments:

Powered by Blogger.