रणसिंग महाविद्यालयाच्या हरीश डोंबाळे ची राष्ट्रीय स्तरावर झेप सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक
रणसिंग महाविद्यालयाच्या हरीश डोंबाळे ची राष्ट्रीय स्तरावर झेप सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक .
---------------------------------
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे.
----------------------------------
कळंब ता.इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला न्हावी ता. इंदापूर येथील हरीश दिपक डोंबाळे यांनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेत सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.
न्हावी गावचा 'हरहुन्नरी' खेळाडू, ज्याने १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.खडतर परिश्रमाने १०० किलोमीटर मास्टर्स सायकलिंग स्पर्धेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवणारे खेळाडू हरीश दीपक डोंबाळे यांना प्रतिकूलतेवर मात करून यश संपादन केल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी त्यांची संघर्षगाथा प्रेरणास्रोत आहे. त्यांचे वडील दीपक डोंबाळे यांचा वारसा घेऊन, हरीश एका लहानशा वस्तीवर राहूनही आपली स्वप्ने मोठी ठेवुन यश प्राप्त केले.हरीश ने सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव विरसिंह रणसिंग यांनी अभिनंदन व्यक्त करीत संस्थेच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता जोपासत असून जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर विविध खेळात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे संस्था व महाविद्यालय सोबत असल्याचे सांगितले.हरीश डोंबाळे यांचे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार विरबाला पाटील,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त राही रणसिंग,विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे , क्रिडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट,माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांनी अभिनंदन केले.

No comments: