Header Ads

गडमुडशिंगी महावितरण कार्यालय जैसे थे!;शिवसेनेच्या आंदोलनाला यश.

 गडमुडशिंगी महावितरण कार्यालय जैसे थे!;शिवसेनेच्या आंदोलनाला यश.

---------------------------------

गांधीनगर प्रतिनिधी 

---------------------------------

गडमुडशिंगी महावितरण शाखा गावाबाहेरील उपकेंद्राजवळ स्थलांतरित करण्याचा महावितरणचा प्रस्ताव ग्रामस्थ व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या तीव्र भूमिकेमुळे अखेर जैसे थे राहिला. 


येथील विद्युक्त महावितरण कार्यालय हलवल्यास नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठांना, दररोजच्या वीजसंबंधित कामांसाठी दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागेल, असा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी जोरदारपणे मांडला. महावितरणकडून मागील काही दिवसांपासून येथील स्थलांतराची तयारी सुरू असल्याची माहिती मिळताच आज शिवसेनेने आंदोलन केल्यामुळे व ग्रामपंचायतीनेही गावातच कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र महावितरणला दिल्यामुळे हे कार्यालय न हलविण्याची मागणी महावितरण कडे केली.


या आंदोलनात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, अपंगसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी तसेच अशोक दांगट अजित  नेर्ले, आनंदा मेंगाने, संभाजी दांगट ,उत्तम जाधव, गणेश चावरे, शेखर शिरगांवे, संजय सकटे, संतोष कुलकर्णी अजित पाटील युवराज पवार यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


चौकट:

 अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत कार्यालय गावातून न हलविण्याची मागणी केली व उपकेंद्रातून हलवलेले साहित्यही कार्यकर्त्यांनी परत कार्यालयात आणले.



चौकट:


उप कार्यकारी अभियंता रोहित कुलकर्णी (हुपरी विभाग) व सहाय्यक अभियंता प्रवीण दळवी (मुडशिंगी शाखा) यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून,

“सदर स्थलांतर प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देत आहोत. कार्यालयासाठी अन्य पर्यायांचा विचार केला जाईल आणि कार्यालय गावातच राहावे यासाठी प्रयत्नशील राहू,” असे स्पष्ट आश्वासन दिले.



फोटो ओळ; गड मूड शिंगीचे विद्युत उपकेंद्र न हलविण्याची मागणी शिवसेनेने आंदोलनवदारे केली.



.

No comments:

Powered by Blogger.