'मोठ्यांचा आदर, लहानांची कदर ' म्हणजेच संस्कार . प्रा .सुषमा पाटील :रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये व्याख्यान.
'मोठ्यांचा आदर, लहानांची कदर ' म्हणजेच संस्कार . प्रा .सुषमा पाटील :रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये व्याख्यान.
------------------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
-------------------------------------------
कंदलगाव , ता. २९ : शालेय जीवनात शिक्षणाची ओढ महत्त्वाची आहे .आणि याच शिक्षणातून सुसंस्कार घडतील. विद्यार्थ्यांमध्ये हेच संस्कार घडवायचे असतील तर एकाग्रता महत्त्वाचे आहे. 'मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर ' म्हणजेच संस्कार म्हणावे. असे प्रतिपादन निवेदिका प्रा. सुषमा पाटील यांनी केले .
आर. के. नगर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'सुसंस्कार काळाची गरज' या व्याख्यानात त्या बोलत होत्या.
प्रा. पाटील म्हणाल्या. सध्याच्या युगामध्ये मोबाईल व अन्य कारणाने एकाग्रता कमी होत आहे. यामध्ये संगत ही महत्त्वाची आहे. शालेय जीवनात वावरताना अनेक गोष्टीं , समस्यांचा सामना करावा लागतो. या वयात होणारे संस्कार आयुष्यभर आपले जीवन सुसंस्कृत करतात.आणि हेच संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी शिक्षक आणि पालकांचा मोठा वाटा असावा.
मुख्याध्यापिका वर्षा बिर्जे यांनी निवेदिका प्रा. पाटील यांचे स्वागत केले.
प्रास्ताविक प्रियदर्शनी माने, पाहुण्यांच्या परिचय प्रतिभा खेडकर व राजीव मुंडे यांनी आभार मानले. यावेळी पर्यवेक्षिका सुनिता मोठे ,प्रल्हाद मोरे , सुनीता कलखांब ,ज्योती शिंदे , किसन कुंवर यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ. कंदलगाव : आर के नगर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथे 'सुसंस्कार काळाची गरज ' या विषयावर व्याख्यान देताना प्रा. सुषमा पाटील, विद्यार्थी

No comments: