Header Ads

गडमुडशिंगीत धुळसिद्ध देव प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन विवीध धार्मिक कार्यक्रम:

 गडमुडशिंगीत धुळसिद्ध देव प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन 

विवीध धार्मिक कार्यक्रम:


-------------

गांधीनगर;प्रतिनिधी 

उदय साळुंखे

-----------

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे

धनगर समाज, ग्रामस्थ यांच्या सहयोगाने  धुळसिद्ध देव प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसर भाव भक्तीच्या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.

------------

ग्रामदैवत धुळसिद्ध देव प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक व  धार्मिक,सांस्कृतिक सोहळा डोळ्याची पारणे फेडणारा आहे.

बुधवार दिनांक ३ डिसेंबर २५ रोजी नव्याने

धुळसिद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने गावातून  पारंपारिक वाद्यवृंद, भजन, धनगरी ढोल, गजानन नृत्य, यासह अन्य वाद्यांच्या गजरात सारा परिसर दुमदुमून जाणार आहे.

_____________


येथे सुहासिनी, माहेर वाशिनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. देव-ऋषी ,संत महात्मे आणि धर्मगुरू व गावातील विविध समाजातील अनेक लोकप्रतिनिधी, स्थानिक पुढारी, ग्रामस्थ , पुजारी यांच्या उपस्थितीत  

हा सोहळा होणार आहे. वालुग मंडळाच्या वत्तीने भंडारा उधळण होणार आहे.

या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन धनगर समाज गडमुडशिंगी आणि श्री. धुळसिद्ध बिरदेव व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले., दिनांक ३ रोजी  मिरवणूक ‘न भूतो न भविष्यति’ स्वरूपाची आहे _____________

भक्त पाळणार पूर्ण  शाकाहार व्रत


प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरपासून चालनविधीला सुरुवात झाली असून १५ जानेवारीपर्यंत श्री.धुळसिद्ध बिरदेवांचे भक्त मांसाहार वर्ज्य करून पूर्ण शाकाहार आचरत आहेत. या संपूर्ण धार्मिक प्रक्रियेसाठी बिरदेव संयोजन समिती, धनगर समाज आणि गावातील सर्वच नागरिक सक्रिय सहभाग घेत आहेत.

_____________


मुख्य प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम

ता. ५ रोजी सकाळी ११ वाजता वेदघोष, मंत्रोच्चार, हवण-होम यांच्या साक्षीने मुख्य प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने संपन्न होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.