मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जण जखमी
मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जण जखमी
मुरगूड / प्रतिनिधी
मुरगूड येथे नगरपालिकेची मतदान प्रक्रिया सुरू असताना मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल ११ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. या अनपेक्षित प्रकारामुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांमध्ये बहुसंख्य महिला, मुलं आणि ज्येष्ठांचा समावेश आहे. जखमींमध्ये रसिका अंबिदास गोंधळी (१५), बापू यल्लाप्या कांबळे (६५), संगीता शिवाजी चांदेकर (५५), समीक्षा शंकर पाटील (१५), विठ्ठल दशरथ वायदंडे (१४), विश्वजीत उमाजी वायदंडे (२२), आशिष बाळसाहेब देवळे (२८), कमल रघुनाथ सूर्यवंशी (७५), राजाराम बळवंत कुडवे (६०), नंदिनी गजेंद्र भोसले (१४) आणि कमल तानाजी चित्रकार (४२) यांचा समावेश आहे.
सर्व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, मुरगूड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी परिसरात पालिकेच्या व पशुवैद्यकीय विभागाच्या टीमकडून कुत्र्यांचा शोध व नियंत्रणाची मोहीम राबवली जात आहे.

No comments: