Header Ads

उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सामाजिक बांधिलकी: ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान .

 उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सामाजिक बांधिलकी: ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान .

--------------

सलिम शेख 

--------------

रक्तदान हीच मोठीं संपती आहे. अपघातातील जखमींना नेहमीच शस्त्रक्रिया वेळी रक्ताची गरज भासते,

उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्र नेहमीच  विविधांगी उपक्रमातून वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करत आहे.यावेळी रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून ३१० वाहनधारक ,युवक यांनी सहभाग घेऊन रेकॉर्ड ब्रेक रक्तदान केले आहे. असे प्रतिपादन उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि सत्यराज घुले यांनी केले.

उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त समर्थ मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

या रक्तदान शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.युवा ग्रामीण विकास संस्था, स्थलांतरित कामगार लक्षगट प्रतिबंध प्रकल्प, गोकुळ शिरगाव , वैभव लक्ष्मी ब्लड बँक, अथायु हॉस्पिटल, नंदादीप नेत्रालय ,कोल्हापूर यांच्या वतीने विविध तपासण्या करण्यात आल्या. वाहन धारकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. इसीजी, बीपी, शुगर अन्य रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या.

या शिबिरासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि सत्यराज घुले, पोलिस निरीक्षक चैतन्य चौगुले, पोलिस उपनिरीक्षक रवी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, पोलिस उपनिरीक्षक संजय पोवार,४०  पोलिस अंमलदार व ३१० रक्तदात्यानी सहभाग नोंदवला होता.सर्व रक्तदात्याना वाहतूक सुरक्षेचा भाग म्हणून हेल्मेट भेट देण्यात आले.तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री. प्रसाद बिंदगे, महामार्ग मृत्युंजय दुत मोहन सातपुते यांनी केले होते. यावेळी 

मृत्युंजय दुत सचिन  नागटिळक ,शिवाजी लोहार , राहुल गिरुले, किरणसिंह शीख यांच्यासह वाहनधारक ,कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ:उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३१० रक्तदात्यानी सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.