स्वर्गीय प्रदीप तोडकर सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आदरांजली वाहण्यासाठी लोटला जनसमुदाय*.....
*स्वर्गीय प्रदीप तोडकर सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आदरांजली वाहण्यासाठी लोटला जनसमुदाय*.....
-------------------------
संस्कार कुंभार.
-----------------------------
वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक,ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ अंबप व भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, विनय रावजी कोरे सहकारी पाणीपुरवठा संस्था अंबप चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्रदीप तोडकर सर यांचे आज प्रथम पुण्यस्मरण.....
त्यांना *आदरांजली वाहण्यासाठी वारणा, पंचगंगा व कृष्णा खोऱ्यातून शेकडो कार्यकर्ते ,चाहत्यांनी व आप्तस्वकीयांनी तसेच समाज,शिक्षण, क्रीडा व राजकारणातील प्रतिष्ठित नागरिकांनी आदरांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती*.
रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल च्या भव्य प्रांगणात व बेलेश्वर मंदिराजवळ सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये माजी खासदार निवेदिता माने वाहिनी, आमदार अशोकराव माने बापू, संजय कोरे आण्णा,विजयसिंह माने, राजवर्धन पाटील, राजेंद्र माने,सरपंच दीप्ती माने,उरून ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, चिमण डांगे, शहाजी पाटील, जयवंत पाटील, दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, डॉ. मिलिंद हिरवे, राहुल सावंत,पुरंदर पाटील, सुभाष जाधव, महिंद्र शिंदे, संजय पाटील, कपिल पाटील, अंबप पंचक्रोशी तील सामाजिक व राजकीय मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments: