Header Ads

संभाजीनगर व रंकाळा बस स्थानक स्वच्छतेत अव्वल; सर्वेक्षण समितीकडून समाधान व्यक्त.

 संभाजीनगर व रंकाळा बस स्थानक स्वच्छतेत अव्वल; सर्वेक्षण समितीकडून समाधान व्यक्त.

----------------------------------------

कोल्हापूर | प्रतिनिधी विजय बकरे :

-----------------------------------------

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कै. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत कोल्हापूरातील संभाजीनगर व रंकाळा बस स्थानकांनी स्वच्छता आणि नियोजनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोन्ही स्थानकांची पाहणी केल्यानंतर सर्वेक्षण समितीचे प्रमुख तथा सोलापूर एसटीचे विभागीय नियंत्रक अमोल गोजारी यांनी समाधान व्यक्त केले.

स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने अमोल गोजारी यांच्यासह कामगार अधिकारी बालाजी कौलगे यांनी संभाजीनगर व रंकाळा बस स्थानकांना भेट देत स्वच्छता, प्रवासी सुविधा तसेच एसटी वाहतुकीचे नियोजन यांची सखोल पाहणी केली. यावेळी स्थानक परिसरातील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे कार्य पाहून त्यांनी कौतुक केले.

याच सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत समितीने गारगोटी, मुरगूड, गडहिंग्लज व राधानगरी या ठिकाणांनाही भेटी दिल्या असल्याची माहिती गोजारी यांनी दिली.

या अभियानासाठी परीक्षक म्हणून पत्रकार विजय बकरे व प्रवासी मित्र दिलीप परीट यांनी काम पाहिले. तसेच सर्वेक्षण समितीचे प्रमुख अमोल गोजारी व कामगार अधिकारी बालाजी कौलगे यांचा सत्कार आगार व्यवस्थापक स्वप्निल पाटील व स्थानिक प्रमुख सुरेश शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या शोभा बुरुड, रंजना परीट, राजू दावणे व कमल कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास आगार व्यवस्थापक स्वप्निल पाटील, स्थानिक प्रमुख सुरेश शिंगाडे, वाहतूक नियंत्रक दीपक पाटील, अमोल खामकर, सागर पाटील, अभिजीत चिले, रवी कुरणे यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.