Header Ads

चक्रवर्ती अशोक सम्राट यांची जयंती गड मुडशिंगी बौद्ध समाजाच्या वतीने उत्साहात साजरा .

 चक्रवर्ती अशोक सम्राट यांची जयंती गड मुडशिंगी बौद्ध समाजाच्या वतीने उत्साहात साजरा .

------------------------

दि २६-३-२०२६

शांती , अहिंसा आणि मानवकल्याणाचा जयघोष करणाऱ्या चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रगतशील आणि न्यायप्रिय विचारांना उजाळा देऊया भिमराव गोंधळी रिपब्लिकन सेना करवीर अध्यक्ष यांनी व्यक्त केले.. यावेळी जेष्ठ नागरिक शामराव कांबळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचारआणि प्रसार सम्राट अशोक राजा केली असे मत आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी व्यक्त केलं .तर इतिहासात असा कोणी राजा होता ज्याने विजयानंतर पश्चाताप केला आज आपल्या तिरंग्यातील अशोक चक्र आणि रोज आठवण करून देतात की सत्ता मोठी नसते विचार मोठे असतात असे मत प्रशांत गोंधळी यांनी व्यक्त केले. मानवते सोबतच मुक्या प्राण्यांसाठीही दवाखाने उघडणारे रस्ते विहीर आणि वृक्षारोपण सारखी लहान मुलांना कल्याणकारी काम करणारे ते पहिले कल्याणकरी राजे होते असे मत अर्जुन कांबळे यांनी व्यक्त केले. बुध्द धम्म हा तलवारीच्या जोरावर नाही तर च चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या करुणेच्या विचारावर जगभर पसरलेला आहे असे मत तानाजी गोंधळी व्यक्त केले. वैशाख कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, अर्जुन गोंधळी यांनी सर्वांना अशोका सम्राट जयंतीच्या शुभेच्छा दिल्या गणेश कांबळे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले


उपस्थित 

अमोल कांबळे,काशिनाथ सोनुले, संदिप गोंधळी, संतोष कांबळे सचिव, शिवाजी कांबळे, परशुराम कांबळे बचाराम सोनुले, शहाजी कांबळे, निशिकांत कांबळे, भिकाजी कांबळे मॅनेजर अंगणवाडीची मुले मुली उपस्थित होते..!


No comments:

Powered by Blogger.