Header Ads

अक्षय चौगुले यांची ‘रजत चषक’साठी निवड; गौरव सोहळा अद्याप प्रलंबित.

 अक्षय चौगुले यांची ‘रजत चषक’साठी निवड; गौरव सोहळा अद्याप प्रलंबित.

मलकापूर रोहित पास्ते (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सन 2023-24 या वर्षासाठी वनसंरक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये कोल्हापूर येथील श्री. अक्षय नामदेव चौगुले यांची ‘रजत चषक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संबंधित शासन निर्णय (जीआर) नुकताच प्रसिद्ध झाला असून, प्रत्यक्ष पुरस्कार वितरण व गौरव सोहळा अद्याप पार पडलेला नाही.

वन व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात केलेल्या प्रभावी कामगिरीच्या आधारे राज्यस्तरीय समितीने चौगुले यांची निवड केली आहे. त्यांच्या कार्याला मलकापूर वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम (RFO) यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.

या निवडीमुळे श्री. चौगुले यांच्या कार्याची राज्य पातळीवर दखल घेतली गेली असून, आगामी काळात होणाऱ्या अधिकृत सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

No comments:

Powered by Blogger.