गणेश पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
गणेश पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी.
------------------------------कोल्हापूर | प्रतिनिधी विजय बकरे.
--------------------------------
कोल्हापूरातील बोंद्रे नगर परिसरातील गणेश पार्क येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, घोटवडे (ता. पन्हाळा) येथील प्राध्यापक प्रशांत मेघावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण, पंचशील, भीमस्तुती व धम्मपालन गाथा म्हणत करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमास गणेश पार्क परिसरातील नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: