ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना सभासद नोंदणी करण्याचे आवाहन
ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना
सभासद नोंदणी करण्याचे आवाहन.
---------------------------मिरज तालुका :- प्रतिनिधी राजु कदम.
-----------------------------
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांनी धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळामध्ये सभासद नोंदणी करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सभासद नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व तक्रारीचे निवारण तसेच नोंदणीचे कामकाज प्राधान्याने करण्याकामी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात एक खिडकी योजना तसेच तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सभासद नोंदणी मोहिमेचे कार्यालयीन कामकाज शिकाऊ अनुज्ञप्ती विभाग (माधवनगर), पक्के अनुज्ञप्ती विभाग (सावळी), उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मुख्यालय जुना बुधगाव रोड सांगली व सिध्देवाडी फिटनेस सेंटर या ठिकाणी 10 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत आहे. तसेच दिनांक 10, 13, 15, 16 व 17 एप्रिल 2026 या दिवशी वाळवा ईश्वरपूर, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर विटा, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ सभासद नोंदणी मोहिम कामकाज कार्यालयीन वेळेत करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

No comments: