सुळंबी येथील सागर पाटील जवानाचा अरुणाचल प्रदेश येथे अपघाती मृत्यू
सुळंबी येथील सागर पाटील जवानाचा अरुणाचल प्रदेश येथे अपघाती मृत्यू.
-------------------------राधानगरी:
राधानगरी तालुक्यातील सूळंबी येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील (वय ४३) यांचे पालम अरुणाचलप्रदेश येथे सेवा बजावत असताना अपघाती निधन झाले. पाटील हे गेले तीन वर्षे अरुणाचल प्रदेश येथे आपले कर्तव्य बजावत होते. नुकतीच त्यांची जम्मू काश्मीर येथे बदली झाली होती, तेथे हजर होण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.अरुणाचलप्रदेश येथील १३८ पालम बटालियन येथे सेवा बजावत असताना गुरुवार, दि. ९ रोजी पहाटे त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. सागर पाटील हे सन २००४ मध्ये केंदीय राखीव पोलिस दलात भरती झाले होते. बावीस वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावली आहे. सागर पाटील यांचे पार्थिव पालम येथून सुळंबी येथे मुळ गावी शनिवार, दि. ११ रोजी आणण्यात येणार असून सकाळी नऊ वाजता शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments: