Header Ads

अपघातातील मृतक व्यक्तींचे कुटुंबीयांना न्याय ध्यावं*. गोरसेना

 *अपघातातील मृतक व्यक्तींचे कुटुंबीयांना न्याय ध्यावं*. गोरसेना .

--------------------------
पुसद तालुका प्रतिनिधी

सिद्धार्थ कदम.

-----------------

 वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद दिग्रस रोड  अनुप्रभा हॉटेल समोर दि.5/4/2026 एक गंभीर वाहन अपघात झाला अपघातामध्ये कैलास रतन राठोड यांचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला आहे. हा अपघात MH.12.JZ.9052 या वाहनामुळे अपघात झाला असून संबंधित आरोपी नामे विनोद मालानी अजूनही मोकाट फिरत असल्याचा आरोप नातेवाईकाकडून करण्यात आला होता.आणि आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. त्यामध्ये पीडित कुटुंबियांवर गुन्हे दाखल सुद्धा केले आहे. मृतक कैलास रतन राठोड व्यक्तीच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मृत्यू कुटुंबियांना तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन वसंत नगर येथे 4 तास बसविण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तक्रार घेण्यात आली. पण आरोपींना आजपर्यंत अटक का केली नाही लवकरात लवकर सदर आरोपीला अटक करण्यात यावी. असे निवेदन गोरसेना या संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांना निवेदन देण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.