*डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधन पर्वाच्या वतीने (४ चार) दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन!* समिती अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती.
*डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधन पर्वाच्या वतीने (४ चार) दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन!*
समिती अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती.
-----------------------
पुसद तालुका प्रतिनिधी
सिध्दार्थ कदम .
------------------------
पुसद:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीच्या पदार्पणा निमित्त प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद प्रबोधनपर्व 2026 यांच्या वतीने दिनांक 16 एप्रिल ते 19 एप्रिल 2026 पर्यंत भिमगित,गायन,तसेच विद्यार्थी व महिलांना मार्गदर्शनपर प्रबोधनाचे चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा पहिला दिवस 16 एप्रिल 2026 रोजी रवी तायडे प्रस्तुत भीमगर्जना या बहारदार भीम गीतांचा आर्केस्ट्रा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बौद्ध धर्मगुरू भंते आर्याजी (बोरी खुर्द)पुसद यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. इंद्रनील नाईक राज्यमंत्री म.रा.हे राहणार आहेत.
दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन तथा चळवळीचे व्याख्याते मा.विठ्ठल कांगणे सर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा सामाजिक प्रबोधन ठेवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य आकर्षन मा.नामदार संजय शिरसाट पालकमंत्री (छ. संभाजी नगर तथा सामाजिक न्याय मंत्री) महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच विशेष उपस्थितीमध्ये समीर वानखेडे (आय आर एस) भारत सरकार,सोबत जयदीप कवाडे उपाध्यक्ष लघुउद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभणार आहे.
दिनांक 18 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक तथा गीतकार चेतन चोपडे (छत्रपती संभाजीनगर,औरंगाबाद) यांचा संगीतमय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ.मोहम्मद नदीम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सचिव हे आहेत.
तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी विशेष महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मा. स्नेहा टोम्पे अमरावती, डॉ.बाबासाहेबांचे महिला विषयी कल्याणकारी धोरण या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. मोहिनीताई नाईक नगराध्यक्ष नगरपरिषद पुसद हे आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरपरिषद सभापती व सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी प्राध्यापिका हे उपस्थित राहणार आहेत.
असे प्रबोधनपर्व समिती 2026 चे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी विश्राम गृह पुसद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी.. उपस्थित विठ्ठलराव खडसे सभापती न.प.पुसद.ॲड.विश्वासराव भवरे, संतोष आंभोरे,अंबादास वानखेडे, नितेश खंदारे, गुरु उचाडे, रंगनाथ धिरे, इत्यादी प्रबोधनपर्व आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments: