विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी या शाळेस माजी विद्यार्थ्यांकडून अडीच लाखाची देणगी
विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी या शाळेस माजी विद्यार्थ्यांकडून अडीच लाखाची देणगी .
_______________
कोल्हापूर: प्रतिनिधी .
संस्कार कुंभार.
----------------------
: सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील विकास विद्या मंदिर या शाळेतील सन १९३८ ते २०१५ या
सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला अडीच लाखाची देणगी देत
कृतज्ञता व्यक्त केली.
उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच व शाळेचे माजी विद्यार्थी उत्तम आंबवडे यांनीही एक लाखाची देणगी दिली. माजी विद्यार्थ्यांनी या निमित्याने आठवणींना उजाळा दिला.लोकनियुक्त सरपंच शुभांगी आडसूळ यांच्या हस्ते शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. आजी- माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी एक लाख ६० हजार तर शिक्षकांनी ११ हजार देणगी दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गजबर, शिक्षणप्रेमी खंडेराव माने, सामाजिक कार्यकर्ते किरण आडसूळ, शाळेचे मुख्याध्यापक अंबादास बडे, सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन दीपक डवर यांनी केले तर आभार रविंद्र केदार यांनी मानले.
फोटो ओळ:विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी येथे माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

No comments: