“हॉटेल बाबामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला; तडजोडीच्या आरोपांनी खळबळ!” माले फाट्यावर बिलाच्या वादातून मारहाण; प्रकरण दाबल्याच्या चर्चेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह.
“हॉटेल बाबामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला; तडजोडीच्या आरोपांनी खळबळ!” माले फाट्यावर बिलाच्या वादातून मारहाण; प्रकरण दाबल्याच्या चर्चेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह.
कोल्हापूर–सांगली महामार्गावरील माले फाट्यावर असलेल्या ‘हॉटेल बाबा’मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बिलाच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणात तडजोडीचा प्रयत्न झाल्याच्या चर्चेमुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हातकणंगले तालुक्यातील माले फाटा येथे असलेल्या ‘हॉटेल बाबा’मध्ये २ एप्रिल रोजी दुपारी जेवणासाठी गेलेल्या एका सहाय्यक फौजदारावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. बिलावरून किरकोळ वाद झाल्यानंतर हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगितले जात असून, प्रकरण हातकणंगले पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, तक्रार नोंदवण्याऐवजी परस्पर तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
दरम्यान, या हॉटेलमध्ये यापूर्वीही ग्राहकांशी वाद आणि मारहाणीच्या घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

No comments: