मु. पो. वाकी बुद्रुक, तालुका महाड, जिल्हा रायगड "माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान" परीक्षेच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने केली शाळा बंद. मुलांचा भविष्य धोक्यात.
मु. पो. वाकी बुद्रुक, तालुका महाड, जिल्हा रायगड "माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान" परीक्षेच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने केली शाळा बंद. मुलांचा भविष्य धोक्यात.
---------------------------
मुंबई प्रतिनिधी
महेश कदम
---------------------------
*महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून गेली पन्नास वर्षे सुरू असलेली शाळा शासनाच्या निर्णयामुळे अचानक बंद करण्यात आली असून या शाळेतील विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक येथील शाळा शासनामार्फत बंद करण्यात आली आहे ३१ मार्च रोजी हा शासनाने निर्णय जाहीर केला असून ०१ एप्रिल पासून या शाळेवरती असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या तालुक्यातील काही शाळांमध्ये करण्यात आले आहेत मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या येत्या ११ एप्रिल पासून सुरू होत आहेत त्यापूर्वीच या शाळेतील सर्व शिक्षकांना आपल्या नवीन शाळेमध्ये हजर राहण्यासाठी सूचना दिले आहेत आणि शिक्षक वर्ग नेमून दिलेल्या शाळांवरती रुजू देखील झाले आहेत, मात्र या शाळेमध्ये इयत्ता आठवी, नववी आणि दहावी या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून आठवी आणि नववीच्या परीक्षा अजूनही बाकी असताना या शाळेतील सर्व शिक्षकांना इतरत्र समावेश करून देण्यात आले आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला असून शाळेमध्ये शिक्षक नसल्याने आता या वर्गातील विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी हवालदिल झाले आहेत आता आमच्या भविष्याचं काय होणार, आम्ही शाळा कशी शिकणार, आमचं वर्ष फुकट जाणार का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असून आमची शाळा ही डोंगराळ भागात असून जवळपास आठ ते दहा किलोमीटर पायपीट करत आम्ही शाळा शिकण्यासाठी येतो आणि हीच जर शाळा बंद झाली तर आम्ही शिक्षणापासून वंचित राहू कारण आम्हाला यानंतर आमच्या गावापासून जवळपास २८ ते ३० किलोमीटर अंतर कापून बिरवाडी मध्ये शिक्षणासाठी जावे लागेल आणि यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दीडशे ते दोनशे रुपये खर्च येईल, आमचे पालक वर्ग हे शेतकरी आहेत आम्ही गरीब कुटुंबातील आहोत आम्हाला शिक्षण घेणे परवडणार नाही त्यामुळे आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागेल, त्यामुळे मायबाप सरकारने आमच्या शिक्षणाचा विचार करून आमची शाळा पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे.*
*वाकी बुद्रुक हे गाव महाड तालुक्यातील जवळपास शेवटचे टोक आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळपास २८ किलोमीटरचा अंतर पार करावा लागते आणि त्यापुढे जाऊन या शाळेत शिकण्यासाठी विद्यार्थी हे डोंगराळ भागातून आठ-दहा किलोमीटरची पायपीट करत येत असतात मात्र या शाळेमध्ये पटसंख्या कमी झाल्याने शासनाच्या धोरणानुसार ही शाळा शासनाने बंद केली आहे परीक्षा तोंडावर आहेत अशातच शासनाने हा निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती एक प्रकारे गदा आणल्याचे चित्र पाहायला मिळत असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी बिरवाडी सारख्या शहराकडे जावे लागेल आणि बिरवाडी शहर हे शाळेपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर आहे या भागाकडे एसटी देखील वेळेवर येत नाही अशा परिस्थितीत बिरवाडी सारख्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे या डोंगर कपारीतल्या विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही आणि हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. परीक्षेच्या तोंडावरच शाळा बंद करून शासनाने या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे हा अन्याय दूर करावा यासाठी आज शाळा प्रशासन शिक्षक रुंद पालक वर्ग यांनी एक मीटिंग सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये पालकाने आपल्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून शाळा बंद पडल्यास आमच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून या ग्रामीण भागामध्ये शासनाने लावलेल्या निकष बदलून आमची शाळा पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी शासनाकडे केली असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर वाकी पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिक विद्यार्थी पालक वर्ग आम्ही शाळेसमोर आत्मदहन करून असा इशारा वाकी गावातील नागरिकांनी शासनाला दिला आहे. आम्ही पन्नास वर्षांपूर्वी लावलेल झाड आता त्याचं वटवृक्ष झाला आहे आणि हे झाड आता कोलमडून पडणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही याचा आम्हाला दुःख होत असून शासनाने निकष बदलावेत आणि ग्रामीण भागासाठी वेगळे निकष लावून आमची शाळा सुरू ठेवावी अशी मागणी या शाळेचे चेअरमन महेंद्र महामुणकर यांनी केली आहे. आमच्या बदल्या झाल्या आम्हाला जवळच्या शाळेमध्ये रुजू होण्यास सांगितले आहे मात्र जसा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे तसाच प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा आम्हाला देखील पडला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शाळेचे मुख्याध्यापक शैलेश काकडे यांनी केली आहे. यावेळी बोलत असताना विस्तार अधिकारी जगदीश गायकवाड यांनी शिक्षकांच जरी समावेशन झालं असलं तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा आश्वासन दिला आहे.*
*वाकी पंचक्रोशीतील तसेच रानवडी, कर्नवडी आणि जवळचे सर्व ग्रामस्थ माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान तर्फे गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक हे पन्नास वर्षांपूर्वीचे मुंबई व ग्रामस्थ यांनी लोक वर्गणीतून निर्माण केलेले हायस्कूल आहे. हे हायस्कूल निर्माण होत असताना अनेक जणांचे योगदान व श्रम लाभले होते. त्यामध्ये खास करून स्वर्गीय महाजन गुरुजी यांचे नाव आवर्जून घेता येईल एखाद्या बाहेरील व्यक्तीने सहकार्य करणे म्हणजे फार मोलाचे आहे व पुढे जाऊन कोकण एज्युकेशन संस्थेने गेले ३५- ४० वर्ष हायस्कूल चालवण्याचे कार्य केले. शासनाचा बहुतेक मराठी शाळा बंद करण्याचे धोरण आहे त्याची खंत वाटते. एखादी संख्या उभी करणे सोपे असते परंतु ती अखंडपणे चालवणे हे अवघड कार्य असते. याची जाणीव आम्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आहे. परंतु शासन धोरणानुसार आपलं हायस्कूल बंद होऊ नये हे काळजीपोटी एक ग्रामस्थ म्हणून आपले सर्वांचे प्रयत्न चालू राहावे यासाठी माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियानात सामील व्हा आणि एक पुण्याचं कार्य जपा ही विनंती ग्रामस्थ यांनी केली आहे. लवकरात लवकर सर्व ग्रामस्थ संपूर्ण माहिती घेऊन एकत्र संस्थेचे आयोजन करू आणि पुढील हायस्कूल वाचवा अभियान याची कार्यवाही करू, त्यासाठी शासन कोकण एज्युकेशन संस्था तसेच आपले लोक प्रतिनिधी त्यांना एकत्र भेट घेऊन वाकी पंचक्रोशीत व आजूबाजूला राहणाऱ्या शेतकरी कुटुंब व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचे नुकसान होणार नाही ह्यासाठी काळजी घ्यावी लागेल. आपण सर्व एकत्र येऊन हा लढा उभारू आणि तो यशस्वी करून त्यातून मार्ग काढू. अशी ग्रामस्थ यांनी विनंती केली आहे*
*गावकरी ग्रामस्थ वाडी*
*शिवाजीनगर वाकी बुद्रुक मुंबई व ग्रामस्थ*
*गावठण मुंबई व ग्रामस्थ*
*शेवते मुंबई व ग्रामस्थ*
*नानेमाची व आव्हाड मुंबई व ग्रामस्थ*
*पेडमकरवाडी व नांद्रुक वाडी मुंबई व ग्रामस्थ*
*आदिवासी वाडी ग्रामस्थ*
*आंब्याचं माळ मुंबई व ग्रामस्थ*
*खडकवाडी मुंबई व ग्रामस्थ*
*रोहिदास वाडी मुंबई व ग्रामस्थ*
*शेंदूरमळई मुंबई व ग्रामस्थ*
*बुद्धवाडी मुंबई व ग्रामस्थ*
*रानवडी, कर्नवडी ग्रामस्थ*

No comments: