निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्र पौर्णिमा उत्साहात साजरी.
निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्र पौर्णिमा उत्साहात साजरी.
-------------------------------------------------
इंदापूर तालुका प्रतिनिधी – गणेश धनवडे.
---------------------------------------------------
इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्र पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने श्री स्वामींची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली असून ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात हरिभक्त परायण ह.भ.प. श्री नागनाथ महाराज क्षीरसागर (पंढरपूर) यांचे प्रेरणादायी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनानंतर श्री स्वामींची आरती व जप करण्यात आला.
त्यानंतर सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे अन्नदाता म्हणून श्री लहू पांडुरंग दरेकर यांनी सेवा दिली.
कार्यक्रमात पालखीची आकर्षक फुलांची सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली, तर मंदिरातील सुंदर रांगोळीची सेवा सौ. शितल सुनील टकले यांनी पार पाडली.
यावेळी मंदिरात श्री विनोद हनुमंत चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या भजनाला महादेव भजनी मंडळाने उत्कृष्ट साथ दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाला गावातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

No comments: