Header Ads

बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्पुर्लीत रुग्णांना फळवाटप गजानन पाटील मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती

 

बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्पुर्लीत रुग्णांना फळवाटप

गजानन पाटील मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती.

----------------------

कोल्हापूर | प्रतिनिधी :

 युवराज पोवार.

-----------------------


कोल्हापूर : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन पाटील मित्र परिवाराच्या वतीने इस्पुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, डॉ. जयश्री कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमातून समाजाप्रती बांधिलकी जपत गरजूंच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:

Powered by Blogger.