मलकापूर येथे ‘भीम-ज्योती समरसता पर्व’ निमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
मलकापूर येथे ‘भीम-ज्योती समरसता पर्व’ निमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
-----------------------------------
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते:
-----------------------------------
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कोल्हापूर ग्रामीण व “स्टुडंट्स फॉर सेवा” यांच्या संयुक्त विद्यमाने नरहर मंदिर, मलकापूर येथे ‘भीम-ज्योती समरसता पर्व’ निमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सौरभ गजानन खोत व श्रेयस चिकुरडे उपस्थित होते. श्रेयस चिकुरडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत अभाविपच्या कार्याचा आढावा दिला.
या शिबिरात “तुमचे रक्त, कोणाचे तरी प्राण… हेच आहे खरे मानवतेचे दान!” या संदेशातून समाजात समरसतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष रश्मी कोठावळे, नगरसेविका नीलम लगारे, पल्लवी पवार, सुरेखा घाटगे, गीता पाटील, नेहा नागवेकर तसेच नगरसेवक संजय मोरे, महेश कोठावळे, रमेश चांदणे, किरण घेवदे, दादासो नाईक, प्रवीण प्रभावळकर, महिपती पाटील, बाजीराव पाटील, मधुकर लाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाहूवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे, पत्रकार विकास कांबळे, रोहित पास्ते यांचीही उपस्थिती होती.
रक्तसंकलनासाठी अंकुर ब्लड सेंटर निपाणी यांचे सहकार्य लाभले. प्रत्येक रक्तदात्यास सन्मानपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच रक्तदानापूर्वी तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आणि सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. रश्मी कोठावळे, मधुकर लाड, प्रवीण प्रभावळकर, रमेश चांदणे, श्रेयस चिकुरडे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अभाविप शाहूवाडी तालुका मलकापूर विभागातील विद्यार्थ्यांनी केले. तालुका संयोजक स्वरूप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रम यशस्वी केला.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

No comments: