Header Ads

कुपवाडमध्ये एसबीआय एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

 कुपवाडमध्ये एसबीआय एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.

---------------------------

सांगली / कुपवाड प्रतिनिधी :

राजु कदम.

-----------------------------

कुपवाड एमआयडीसी परिसरातील आर. पी. पाटील चौक येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएम मशीनची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.२० ते १० एप्रिल रोजी सकाळी ६.३० या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने एटीएम क्रमांक T1BF000471082 मध्ये प्रवेश करून कोणत्यातरी साधनाच्या साहाय्याने मशीन फोडून नुकसान केले.

याबाबत भिकाजी संभाजी लिमकर (वय ४५, रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७/२०२५ बीएनएस कलम ३०५(अ), ६२, ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत कोणतीही रोकड चोरीला गेली नसून, एटीएम मशीनचे नुकसान झाले आहे. पुढील तपास म.पो.ना. २२०६ दाभाडे हे सपोनि घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत

No comments:

Powered by Blogger.