Header Ads

अंबाबाई मंदिरात तोतयागिरी; भाविकांकडून पैसे उकळणारी महिला ताब्यात

 अंबाबाई मंदिरात तोतयागिरी; भाविकांकडून पैसे उकळणारी महिला ताब्यात.

--------------------------------
शशिकांत कुंभार.
--------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी :कोल्हापुरातील प्रसिद्ध अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शितल अविनाश पाटील (रा. फुलेवाडी) असे तिचे नाव असून, ती पोलीस तसेच सुरक्षा रक्षक असल्याचे भासवून भाविकांकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ‘व्हीआयपी दर्शन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे घेत होती. याबाबत महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे विक्रम आकाराम शिंदे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला नोटीस देऊन सोडण्यात आले असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कापसे हे पुढील तपास करत आहेत.

अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.