Header Ads

विट्यात थरारक घटना! पत्नीची निर्घृण हत्या करून पती फरार

 विट्यात थरारक घटना! पत्नीची निर्घृण हत्या करून पती फरार

-------------------------

सांगली मिरज प्रतिनिधी.

राजू कदम.

--------------------

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली असून, पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या करून फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

विटा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आरोपी सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके (वय २९) याने दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पत्नी श्रद्धा उर्फ काजल सोनल लोटके (वय २०) हिच्यावर लोखंडी गजाने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना विटा येथील साळशींग रोड परिसरात घडली.

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून Hero Honda SS मोटारसायकल (MH-10-B-4061) घेऊन पसार झाला असून, विटा पोलिसांसह सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलीसांनी आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामुळे विटा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

👉 पोलिसांचे आवाहन

या आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून योग्य ते बक्षीसही दिले जाणार आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – पोलिसांचा शोधमोहीम वेगात

या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, आरोपी लवकरात लवकर जेरबंद व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे.

No comments:

Powered by Blogger.