Header Ads

महिला भगिनींना न्याय हक्क वाचनांमधून ‌ समजावे यासाठी रिपब्लिकन सेनेने केले संविधानाच्या प्रतीचे वाटप

 महिला भगिनींना न्याय हक्क वाचनांमधून ‌ समजावे यासाठी रिपब्लिकन सेनेने केले संविधानाच्या प्रतीचे वाटप.

-------------------

संस्कार कुंभार 

-------------------

दि १४-४-२०२६

"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व सर्वस्पर्शी होते. त्यांनी केवळ वंचित घटकासाठी, महिलासाठीच काम केले असे नसून संपूर्ण समाजाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे."असे प्रतिपादन प्रा. बीजी मांगले यांनी येथील सभेत केले. आज बाबासाहेबांची ते 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यात आले ‌कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना पुढे ते म्हणाले,"बाबासाहेबानी भारताचे संविधान निर्माण केले. श्रीमंती, जात ,धर्म, पंत,पक्ष असा कोणताही भेदभाव विचार न करता प्रत्येकाला एक मताचा अधिकार देऊन समता प्रस्थापित केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मूलमंत्र म्हणजे समस्त समाजाच्या आयुष्याच्या वाटचालीचा पाया आहे 


त्यावेळी बोलताना भीमराव गोंधळी रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणाले,"बाबांच्या मार्गदर्शनाने कोट्यावधी वंचित घटकांना  समाजाच्या मुख्य प्रवाहात येता आले. एमपीएससी आणि यूपीएससीच्या माध्यमातून हजारो- लाखो समाज बांधव आज देशाची सेवा करताहेत. ही बाबासाहेबांची देणगी आहे."

बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या प्रती रिपब्लिकन सेनेच्या वतीने  शिक्षिका व उपस्थितांना वाटण्यात आल्या. त्यायोगे बाबासाहेबांचा विचार समाजात रुजला जावा अशी इच्छा व्यक्त केली. उषा पाटील शिक्षका यांनीही मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन प्रशांत गोंधळी यांनी केले 


त्यावेळी उपस्थित 

अर्जुन कांबळे महासचिव, शिवाजी कांबळे, अर्जुन गोंधळी महासचिव, विद्युलता पाटील, हेमलता जोपळे, ययाती राजदीप, संतोष कांबळे सचिव, संगीता गवळी, सुजाता कांबळे, अमोल कांबळे, वैभव शिंदे, अशोक भोसले, दिपक डोणे, सनी गोंधळी, अविनाश कांबळे उपस्थित होते

No comments:

Powered by Blogger.