न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA) कोल्हापूरची दमदार नवी कार्यकारिणी जाहीर; होमिओपॅथी क्षेत्रात नवे पर्व सुरू (सन 2026–27)
न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA) कोल्हापूरची दमदार नवी कार्यकारिणी जाहीर; होमिओपॅथी क्षेत्रात नवे पर्व सुरू (सन 2026–27)
-----------------------
कोल्हापूर, प्रतिनिधी :
युवराज पोवार .
----------------------
न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA) कोल्हापूरच्या सन 2026–27 या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड करण्यात आली. या नव्या नेतृत्वामुळे असोसिएशनच्या कार्याला नवी ऊर्जा, स्पष्ट दिशा आणि व्यापक गती मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
अध्यक्षपदी डॉ. सचिन भादवणकर, उपाध्यक्षपदी डॉ. चेतन गुरव, सचिव व असोसिएशनचे प्रवक्ते म्हणून डॉ. तुषार पांडव, तसेच खजिनदारपदी डॉ. रायसिंग चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सल्लागार समितीत डॉ. शितल पाटील-वसगडेकर व डॉ. हर्षवर्धन जगताप या अनुभवी मार्गदर्शकांचा समावेश असून, कायदेशीर सल्लागार म्हणून डॉ. दिपक पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा सचिवपदी डॉ. राहुल घोलप यांची निवड झाली आहे.
महिला कार्यकारिणीत डॉ. दीपाली देसाई, डॉ. प्रिया पाटील आणि डॉ. मंजुषा मोरे यांचा सक्रिय सहभाग असोसिएशनच्या सर्वांगीण बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली असोसिएशनकडून होमिओपॅथीविषयी व्यापक जनजागृती, डॉक्टरांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक कार्यशाळा व सेमिनार, ग्रामीण व शहरी भागात आरोग्य शिबिरे, मेडिको-लीगल मार्गदर्शन व सल्ला सेवा, तसेच युवा होमिओपॅथिक डॉक्टरांना करिअर व प्रॅक्टिस मार्गदर्शन असे बहुआयामी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सदस्यांमध्ये समन्वय वाढवणे, क्लिनिकल अपडेट्स शेअर करणे आणि संघटनेचे नेटवर्क अधिक मजबूत करणे यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.
निवडीनंतर अध्यक्ष डॉ. सचिन भादवणकर यांनी, “सर्व सदस्यांच्या सहकार्याने NIHA कोल्हापूरला अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी असोसिएशन बनवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. समाजाभिमुख उपक्रमांद्वारे होमिओपॅथीचा प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.
तर सचिव डॉ. तुषार पांडव यांनी, “असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांना व्यावसायिक, शैक्षणिक व कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून एक मजबूत व्यासपीठ व संघटना निर्माण करण्यावर आमचा विशेष भर राहील. तसेच नवोदित डॉक्टरांना योग्य दिशा देणे ही आमची प्राथमिकता असेल,” असे मत व्यक्त केले.
या कार्यकारिणीत अनुभवी नेतृत्व, युवा ऊर्जा आणि महिला सशक्तीकरण यांचा उत्कृष्ट संगम साधण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात NIHA कोल्हापूर होमिओपॅथी क्षेत्रात अधिक प्रभावी, संघटित आणि दिशादर्शक भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

No comments: