Header Ads

एस.टी.च्या १०% भाडेवाढीवरून करवीर शिवसेनेचा संताप; त्वरित रद्द करण्याची मागणी.

 एस.टी.च्या १०% भाडेवाढीवरून करवीर शिवसेनेचा संताप; त्वरित रद्द करण्याची मागणी.

-------+----------------

शशिकांत कुंभार.

------+-----------------

कोल्हापूर, दि. २२ एप्रिल २०२६ : राज्य परिवहन महामंडळाने १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी लागू केलेली १० टक्के एस.टी. भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत सापडले असून निर्यात-आयात ठप्प झाली आहे. गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत, तर कामगार वर्ग गावाकडे परतत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक ठरलेल्या एस.टी. प्रवासावर १०% भाडेवाढ करून गोरगरीबांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

या मागणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक अभय देशमुख यांच्या नावे निवेदन देण्यात आले. विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर यांनी हे निवेदन स्वीकारले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी हा विषय मंत्रालयातील वरिष्ठांकडे पाठवून आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, फेरीवाला संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, तसेच सुनील पारपानी, अजित चव्हाण, रामराव पाटील, बाबुराव पाटील, भूषण चौगुले आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.