Header Ads

जोरदार वाऱ्यासह गारपीट; भेंडवडे परिसरात मुसळधार पाऊस, वीजपुरवठा विस्कळीत.

 जोरदार वाऱ्यासह गारपीट; भेंडवडे परिसरात मुसळधार पाऊस, वीजपुरवठा विस्कळीत.


--------------------------

हातकणंगले तालुका प्रतिनिधी

महेश कांबळे .

------------------

भेंडवडे, लाटवडे, खोची, भादोले व पेठवडगाव परिसरात मंगळवारी उशिरा रात्री अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

या पावसादरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला असून काही ठिकाणी अल्प प्रमाणात गारपीटही झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची काही काळ धांदल उडाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने काही ठिकाणी झाडे थेट विद्युत तारेवर पडल्याने तारा तुटल्याच्या घटना घडल्या.

तसेच वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे काही भागात विद्युत खांब तिरके झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे काही परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, वीज कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तिरके झालेले खांब सरळ करणे व तुटलेल्या तारा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा व इतर फळझाडांचे नुकसान झाले असून हायब्रीड ज्वारी, मक्का पिकांनाही फटका बसल्याचे समोर येत आहे.

या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता व्यक्त होत आहे

No comments:

Powered by Blogger.