माणुसकीचा आदर्श जपणारे मांगले येथील कुंभार कुटुंबीय.
माणुसकीचा आदर्श जपणारे मांगले येथील कुंभार कुटुंबीय.
-----------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
------------------------------------
“माणसात देव शोधा” ही संकल्पना प्रत्यक्ष आचरणातून जपणारे मांगले येथील कुंभार कुटुंबीय समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. स्वतःच्या दुःखावर मात करत त्यांनी सामाजिक बांधिलकीची जपलेली परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कोरोनाच्या भीषण काळात कुंभार कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा कै. सतीश बंडू कुंभार यांचे दुःखद निधन झाले. या घटनेला पाच-सहा वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आपल्या मुलाच्या स्मृती जपताना त्यांनी दुःखात न अडकता समाजसेवेचा मार्ग स्वीकारला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ४ मे २०२६ रोजी कै. सतीश बंडू कुंभार यांच्या स्मरणार्थ पंढरपूर येथील पालवी संस्थेतील अनाथ मुलांसाठी १० हजार रुपयांची मदत देणगी अर्पण करण्यात आली. सातवे येथील श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते तसेच मांगले येथील आटपाडी-पंढरपूर दिंडी सोहळ्यातील भाविकांच्या उपस्थितीत हा देणगी सोहळा पार पडला.
ही देणगी मा. श्री. बंडू निवृत्ती कुंभार, सौ. अनुसया बंडू कुंभार, श्रीमती शीतल सतीश कुंभार तसेच मानव व सोहम सतीश कुंभार या परिवाराच्या वतीने अर्पण करण्यात आली.
वर्षश्रद्धा किंवा इतर धार्मिक खर्च न करता समाजातील गरजू, अनाथ मुलांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा त्यांनी घेतलेला सामाजिक वसा खरोखरच कौतुकास्पद आहे. संवेदनशीलता, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे हे आदर्श कुटुंब समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
कुंभार कुटुंबीयांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक कौतुक होत असून त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments: