Header Ads

न्यू इंग्लिश स्कूल करंजफेणचा दणदणीत निकाल; ९२.८५% यशासह विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी

 न्यू इंग्लिश स्कूल करंजफेणचा दणदणीत निकाल; ९२.८५% यशासह विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी.

---------------------------------------------

शाहुवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकार.

----------------------------------------------

शाहुवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल करंजफेणने यंदाच्या एसएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९२.८५ टक्के, तर सेमी इंग्रजी विभागाचा निकाल १०० टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


यंदाच्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला. परीक्षेत १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, १८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर २३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. एकूण ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुणानुक्रमात

🥇 प्रथम क्रमांक – कु. प्रथमेश राजाराम तेलवणकर (८७.६०%)

🥈 द्वितीय क्रमांक – कु. प्रथमेश संदीप मालप (८६.६०%)

🥉 तृतीय क्रमांक – कु. तेजश्री तानाजी राऊत (८५.४०%)

या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यानेच हे यश शक्य झाल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.