माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन २०२६ उत्साहात संपन्न
माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन २०२६ उत्साहात संपन्न.
---------------------------------------इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे.
---------------------------------------
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात वाणिज्य शाखा बॅच २०१३ ते २०१६ च्या विद्यार्थ्यांचे “माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन २०२६” उत्साहपूर्ण संपन्न झाला.
इंदापुर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थिती मधुन देखील समाजात व विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी असलेले नाते कायम जपावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.दहा वर्षांनंतर एकत्र येण्याची संधी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता होती. जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव,मैत्री आणि आठवणी व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळिग, डॉ. प्रशांत शिंदे,डॉ.सुहास भैरट, डॉ. तेजश्री हुंबे, प्रा.सोनाली चव्हाण
सेवानिवृत्त प्रा.अरुण कांबळे, प्रा.डॉ. दिलीप मोरे, प्रा. डॉ. बबन भापकर, प्रा.मारुती जाधव, महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास कलर प्रिंटर भेट दिला.स्नेहसंमेलनामुळे जुन्या मैत्रीला नवसंजीवनी मिळाली असून भविष्यातही असे उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प माजी विद्यार्थी यांनी व्यक्त केला.

No comments: