मुरगुडचे प्रा. रवींद्र शिंदे शुक्रवारपासून पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर.
मुरगुडचे प्रा. रवींद्र शिंदे शुक्रवारपासून पाच दिवस कोल्हापूर
आकाशवाणीवर.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुरगूड / जोतीराम कुंभार.
------------------------------------------
मुरगूड :- येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूरवरुन शुक्रवार दि. ८ मे पासून मंगळवार दि. १२ मे पर्यंत दररोज सकाळी ७ वा. प्रसारित होणार आहेत. सलग पाच दिवसाच्या कालावधीत कोल्हापूर आकाशवाणीवरील 'ऐसी अक्षरे रसिके' या सदरामध्ये दररोज आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध विषयांवर वैचारिक बंध प्रसारित होणार आहेत. समाजातील विविध नामवंत लेखकांचे वैचारिक लेख या सदरामध्ये प्रसारित होत असतात. प्रा. शिंदे यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे विविध विषयांवर लेखही प्रसिद्ध झाले आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सूत्रसंचालनही केले आहे. या अगोदर ११ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान त्यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रविण चिपळूणकर यांच्या आवाजात प्रसारीत झाले होते. यावेळचे प्रसारण स्वतः प्रा. शिंदे यांच्या आवाजामध्ये होणार आहेत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

No comments: