कोल्हापुरात कॅफेमध्ये अश्लील कृत्यास वाव; दोघांवर गुन्हा
कोल्हापुरात कॅफेमध्ये अश्लील कृत्यास वाव; दोघांवर गुन्हा.
--------------------
रहिम पिंजारी.
---------------------
कोल्हापूर : शहरातील बिंदू चौक परिसरातील एका कॅफेमध्ये तरुण-तरुणींना अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ५ मे २०२६) दुपारी सव्वा एकच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॅफेमध्ये नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतरीत्या अंतर्गत बदल करण्यात आले होते. कॅफेच्या हॉलमध्ये लपविलेले कप्पे (पार्टिशन) तयार करून ग्राहकांना गोपनीय जागा उपलब्ध करून दिली जात होती. यामुळे सार्वजनिक नियम व सरकारी आदेशांचे उल्लंघन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी ओम राजेंद्र थोरात (वय २४, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) व स्वराज्य अरुण पाटील (वय २५, रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कॅफेमध्ये अशा प्रकारची अनधिकृत व्यवस्था केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिवदर्शन सर्जेराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत तसेच सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे

No comments: