Header Ads

श्री संत गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक महापारायणाचे आयोजन

 श्री संत गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक महापारायणाचे आयोजन.

चांदूर बाजार, दि.२० : मयुर खापरे प्रतिनिधी


पुरुषोत्तम मास (अधिक मास) निमित्त स्व. श्री. रवीभाऊ पवार, स्व. सौ. सुमतीआई केशवराव टोम्पे, स्व. श्री. केशवराव टोम्ये व स्व. श्री. नितीनभाऊ कोरडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्री संत गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय सामूहिक महापारायणाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय सोहळा निर्मिती पब्लिक स्कूल, स्व. संजय टोम्पे स्मृती जलतरण तलाव, नानोरी रोड, चांदूर बाजार येथे संपन्न होणार असून दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री संत गजानन महाराजांच्या मुंडगाव येथील पादुकांचे आगमन,

तसेच दासगणु लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोदत पारायण डॉ. गजानन खासनीस (पुणे) यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. त्यामुळे चांदूर बाजार नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे. श्री संत गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित या पवित्र सोहळयात सहभागी होण्यासाठी भाविकांनी आपली नोंदणी करून 'श्रीं'च्या चरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज सेवा समिती व भक्तपरिवार गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट, चांदूर बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी संपर्क- ९७६६९३८३६३ ,९४२१७३६८७२, तुच दिले हे जीवन देवा, तुझ्या कारणी पडोज जाता जाता दोन हाताने काही चांगले घडो या भावनेतून होणाऱ्या या भक्तिसोहळ्यास चांदूर बाजार परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.