कुपवाडमध्ये १३४ किलो गांजासह आरोपी जेरबंद; ४२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
कुपवाडमध्ये १३४ किलो गांजासह आरोपी जेरबंद; ४२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
----------------------सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत कुपवाड एमआयडीसी परिसरातून तब्बल १३४ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत विकी विजय कांबळे (रा. जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गांजा, इनोव्हा कार, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओडिसा राज्यातून गांजाची खरेदी करून सांगलीत विक्रीसाठी आणत होता. कुपवाड एमआयडीसी ते सोसायटी चौक मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे पुढील तपास करीत आहेत.

No comments: