Header Ads

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त.


------------=-----------------
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
-------------------------------

महागाव : अवैधरित्या गावठी बनावटीचे देशी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळ (कॅम्प) पुसदच्या पथकाने अटक केली. या कारवाईत एक गावठी बनावटीचे देशी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी शोध मोहिमेवर असताना गुप्त माहिती मिळाली की, आंबोडा गावाजवळील तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल बाळगून फिरत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव रवि संतोष शिंगारे (वय 29 वर्षे, रा. धर्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे 30 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे देशी पिस्तूल तसेच 1 हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 320/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. धीरज बांडे, पो.उपनि. अमोल राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील या धडाकेबाज कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यवतमाळ पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


No comments:

Powered by Blogger.