स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेनेचा इशारा; "जनतेला विश्वासात घ्या, अन्यथा उग्र आंदोलन छेडू"
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेनेचा इशारा; "जनतेला विश्वासात घ्या, अन्यथा उग्र आंदोलन छेडू"उंचगावात एमएसईबी कार्यालयावर शिवसैनिकांचा धडक मोर्चा; शाखा अभियंत्यांना निवेदन.
--------------------------उंचगाव : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना उंचगाव शाखेच्या वतीने एमएसईबी प्रशासनाला तीव्र इशारा देण्यात आला. जनतेला विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले यांनी दिला.
उंचगाव येथील एमएसईबी कार्यालयात शाखा अभियंत्यांना निवेदन देताना चौगुले यांनी स्मार्ट मीटर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. उंचगाव हे सुमारे ६० ते ७० हजार लोकवस्तीचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार व रोजंदारी करणारा वर्ग वास्तव्यास आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा सविस्तर माहिती न देता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याबाबत ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता त्यांनाही स्मार्ट मीटर योजनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे समोर आले. तसेच काही वायरमन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
स्मार्ट मीटरचे फायदे आणि तोटे नागरिकांना समजावून सांगणे आवश्यक असून, अर्थिंग नसलेल्या घरांना होणारे संभाव्य नुकसान, प्लगमध्ये उपकरणे जोडलेली असतानाची वीज वापर गणना यासारख्या मुद्द्यांवर जनजागृती करणे गरजेचे असल्याचे विक्रम चौगुले यांनी सांगितले. लोकांना पूर्ण माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतरच स्मार्ट मीटर बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शाखा अभियंत्यांनी निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. मात्र जनतेला विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले, विराग करी (माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, उंचगाव), भाऊ चौगुले (माजी युवासेना तालुकाप्रमुख), महेश खांडेकर (माजी ग्रामपंचायत सदस्य), अमोल पोवार, राम पाटील, गणेश मस्कर, गणेश गावडे, सचिन माने, अजित रोटे, सचिन गुरव, प्रमोद शिंदे, मुमताज धारवाडकर, अनिल माने, जीतू सुतार, आंबा जाधव, धनंजय पाटील, हौसेराव राजमाने, जगन्नाथ माने, सुनील पारपानी, दीपक फ्रेमवाला, विनोद रोहीडा, उत्तम आडसुळ, अनिल माळी, सुजल पवार, रंगराव पाटील, चेतन ननवरे, शिवम चौगुले, सुमित लांबोरे, अथर्व सूर्यवंशी, शिवाजी लोहार, बंडा यडुरकर, पाटील मामा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

No comments: