सरनोबतवाडीत घरफोडी; 56 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास.
सरनोबतवाडीत घरफोडी; 56 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
------------------------------शशिकांत कुंभार.
------------------------------
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विकी अनिल पुजारी (वय 36, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 20 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे मणी, गळ्यातील पेंडंट आणि कानातील टॉप्स असा एकूण 55 हजार 965 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) व 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments: