"योगासन करा, रोग टाळा; निरोगी आयुष्याचा मंत्र स्वीकारा" – नगरसेवक अभिजीत खतकर.
"योगासन करा, रोग टाळा; निरोगी आयुष्याचा मंत्र स्वीकारा" – नगरसेवक अभिजीत खतकर.
---------------------------------------आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोल्हापुरातील नवीन वाशी नाका परिसरातील भैयासाहेब परदेशी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना नगरसेवक अभिजीत खतकर यांनी नागरिकांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत, "योगासन करा व रोग टाळा" असा निरोगी जीवनाचा संदेश दिला.
योगाचे महत्त्व विशद करताना खतकर म्हणाले की, महिला, तरुण, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊन आयुष्य अधिक निरोगी आणि आनंदी होऊ शकते.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांना योगाभ्यासासाठी भैयासाहेब परदेशी यांनी उपलब्ध करून दिलेल्या हॉलची दुरवस्था लक्षात घेऊन त्याठिकाणी आवश्यक विद्युत सुविधा व देखभाल करून देण्याचे आश्वासनही खतकर यांनी दिले.
कार्यक्रमात नगरसेवक वैभव कुंभार यांनीही ज्येष्ठ नागरिकांच्या योग उपक्रमांसाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पत्रकार विजय बकरे यांचा नगरसेवक अभिजीत खतकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेविका जयश्री कांबळे, सामाजिक कार्यकर्ते योगेश ओटणकर, एम. डी. पाटील, गणपतराव बागडी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोतनीस यांनी केले, तर आभार प्रदर्शन दादासाहेब शिंदे यांनी केले.
योग, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडविणारा हा योग दिन कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

No comments: